ठाणेगाव येथील मजूरांचे झाडे लावण्याच्या कामावर घेण्यासाठी आंदोलन


- आ. गजबे, माजी आ. गेडाम यांची भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
ठाणेगाव येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ठाणेगाव येथील मजूर तीन - चार दिवसांपासून वनीकरणाच्या कामावर जात आहेत. परंतु कामाच्या ठिकाणी एकही अधिकारी उपस्थित राहून काम सुरू करीत नसल्यामुळे मजूर रिकाम्या हाताने परत येत आहेत. यामुळे मजूरांनी काम सुरू करावे, या मागणीसाठी वैरागड मार्गावर बसुन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला आमदार कृष्णा गजबे आणि माजी आ. आनंदराव गेडाम यांनी भेट देवून मजूरांशी चर्चा केली.
आज ८ जुलै रोजी सकाळी मजूर वृक्षलागवडीच्या कामावर गेले. जवळपास एक ते दीड  हजार मजूर उपस्थित होते. मात्र तिथे कुठलाही अधिकारी उपस्थित नव्हता आणि कामही सुरू झाले नव्हते. यामुळे मजूरांनी लगेच आमदार कृष्णा गजबे यांना माहिती देवून घटनास्थळी पाचारण केले. यानंतर माजी आ. गेडाम यांच्या उपस्थितीत वैरागड मार्गावरच बसून आंदोलनाला सुरूवात केली. काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली. यानंतर आ. कृष्णा गजबे व माजी आ. आनंदराव गेडाम यांनी मजूर व वनपरीक्षेत्र अधिकारी बारसागडे, आरमोरीचे नायब तहसीलदार कुकडकार, वनरक्षक मडावी यांच्याशी चर्चा केली. यानंतर जवळपास १ हजार मजूरांना वृक्षलागवड करण्यासाठी काम देण्यात आले. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-08


Related Photos