महत्वाच्या बातम्या

 मान्यताप्राप्त २११ मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाची यादी प्रसिद्ध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : १  जानेवारी २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने, पूर्व पुनरीक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून,भारत निवडणूक आयोगाच्या  निर्देशानुसार २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्राच्या नावातील बदलाचे १३७, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे ५४ तसेच मर्ज करण्यात आलेल्या ९ मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान केंद्रावरील १५०० मतदारापेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्राच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणारे ११ मतदान केंद्र असे एकूण २११ मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेचे प्रस्ताव ३ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फतीने भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आले.  

सदर २११ मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने १८ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली असल्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. तरी सदर मान्यताप्राप्त २११ मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाची यादी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos