महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१६ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१७७५ : ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.

१७९३ : फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

१८४६ : डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

१८६८ : डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.

१९०५ : भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.

१९२३ : वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी द वॉल्ट डिस्‍ने कंपनी ची स्थापना केली.

१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.

१९६८ : हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

१९७३ : हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९७५ : बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.

१९७८ : माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.

१९८४ : आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९८६ : ८००० मीटर पेक्षा उच्च असणारी १४ शिखरे सर करणारे रिइनॉल्ड मेस्नर हे पहिली व्यक्ती ठरले.

१९९९ : जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

१६ ऑक्टोबर जन्म

१६७० : शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १७१६)

१८४१ : जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९०९)

१८४४ : अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान इस्माईल क्यूम्ली यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९१९)

१८५४ : आयरिश लेखक व नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९००)

१८८६ : इस्राईल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरीयन यांचा जन्म.

१८९० : वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७)

१८९६ : स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९७४)

१९०७ : कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८२)

१९२६ : केबल विजन आणि एचबीओ चे संस्थापक चार्ल्स डोलन यांचा जन्म.

१९४८ : अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक हेमा मालिनी यांचा जन्म.

१९४९ : भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार क्रेझी मोहन यांचा जन्म.

१९५९ : मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून २०१०)

१९८२ : भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन यांचा जन्म.

२००३ : नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.

१६ ऑक्टोबर मृत्यू

१७९३ : फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १७५५)

१७९९ : भारतीय स्वातंत्र्यसैनिक वीरपदिया कट्टाबोम्मन यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १७६०)

१९०५ : आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुन्द्री यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८५५)

१९४४ : उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.

१९४८ : नाटककार माधव नारायण तथा माधवराव जोशी यांचे निधन.

१९५० : अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक वि. गं. तथा दादासाहेब केतकर यांचे निधन.

१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या. (जन्म: १ ऑक्टोबर १८९५)

१९८१ : इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचे निधन. (जन्म: २० मे १९१५)

१९९७ : मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.

२००२ : लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२३)

२०१३ : भारतीय नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos