दिल्लीतील भाजप मुख्यालयाला बॉ़म्बने उडवून देण्याची धमकी


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : मुख्यालयाच्या कंट्रोल रुमला फोन करून  दिन दयाल मार्गावरील भाजपच्या मुख्यालयाला बॉ़म्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.   या धमकीनंतर मुख्यालयाची सुरक्षा तत्काळ  वाढविण्यात आली.
 आज शनिवारी सकाळी ११ वाजताच्या  सुमारास भाजप मुख्यालयात एका व्यक्तीने फोन करून मुख्यालय बॉम्बने उडवून देणार असल्याचे सांगतिले. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा फोन कर्नाटकमधील मैसूर येथून आल्याचे समजले. याबाबत कर्नाटक पोलिसांनी तपास केल्यानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले मात्र त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचे समोर आले. तसेच त्या व्यक्तीने याआधीही अशा प्रकारच्या खोट्या धमक्या दिल्याचे समजते.  Print


News - World | Posted : 2019-06-22


Related Photos