महत्वाच्या बातम्या

 नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम

न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आगामी वर्ष हे निवडणूकांचे वर्ष असल्याने आणि १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत असल्याने निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रम कालावधीत मतदार नोंदणी, नावांची दुरस्ती, वगळणी व आधार जोडणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

९ ऑक्टोबरपर्यंत मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण करण्यात येणार आहे. १० ते २६ ऑक्टोबर दरम्यान नमुना १ ते ८ तयार करणे, १ ऑक्टोबर २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत प्रारुप मतदार यादी व पुरवणी यादी तयार करण्यात येईल. २७ ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दावे व आक्षेपांची सुनावणी करण्यात येईल. २६ डिसेंबर रोजी दावे व आक्षेप निकाली काढण्यात येईल व ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos