संपकरी डॉक्टर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चेला तयार मात्र प्रसार माध्यमांसमोर चर्चेची अट


वृत्तसंस्था /  कोलकाता :  पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांचा विचार करून आम्ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत,  मात्र, ही चर्चा बंद खोलीत न करता प्रसार माध्यमांसमोर करण्याची अट संपकरी डॉक्टरांनी ठेवली आहे.
 ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी आणि शनिवारी संपकरी डॉक्टरांना चर्चा करण्यासाठी बोलावले होते. मात्र, राज्यात दहशतीचे वातावरण असून भीती आणि सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार नसल्याची भूमिका संपकरी डॉक्टरांनी घेतली होती. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांशी संवाद साधावा असे डॉक्टरांनी म्हटले होते. मात्र, आता बॅनर्जी यांच्यासोबतच चर्चेला तयार असून प्रसार माध्यमांसमोर चर्चा करावी, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. मात्र, मुलाखतीची वेळ आणि ठिकाण ठरलेले नाही.  डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे राज्यातील संप मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.    Print


News - World | Posted : 2019-06-16


Related Photos