पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गर्तेत, दूध २०० रुपये लिटर


वृत्तसंस्था /  इस्लामाबाद :   पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तूलनेत पाकिस्तानचा रुपया घसरून १६० वर पोहोचला. तर दुसरीकडे महागाईचा भडका उडाला असून दूध २०० रुपये प्रतिलीटरवर झाले आहे.   सरकारने महागाई आटोक्यात आणली नाही तर देशाची आर्थिक स्थिती नियंत्रणाबाहेर जाईल असा इशारा स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दिला आहे. तर पाकिस्तानला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकांना संपत्ती घोषणा योजनेअंतर्गत सर्व नागरिकांनी ३० जूनपर्यंत आपल्या अघोषित संपत्तीची माहिती द्यावी आणि कर भरणा करण्याचे आवाहन केले आहे.
 पाकिस्तानात महागाईच्या विस्फोटामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेदेखील अशक्य झाले आहे. भाजीपाल्यासह कडधान्यांच्या किमतीमध्ये ४५ ते ८० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर सफरचंद ४०० रुपये किलो, संत्री ३६० रुपये किलो असून केळी १५० रुपये डझनने विकली जात आहेत. तर मटण तब्बल १ हजार १०० रुपये प्रति किलोने विकले जात आहे. पाकिस्तानात सोन्याचा भाव देखील प्रतितोळा ६५ हजारांवर पोहोचला आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमतीसह घरगुती गॅसच्या किमती देखील गगनाला भिडल्याने सामान्य नागरिकांना जगणे देखील कठीण झाले आहे. त्यातच स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने व्याजदर वाढवून १२.२५  केला आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-06-16


Related Photos