जलसमृद्धी सोबत शेती सबलीकरणाचे शासनाचे पाऊल : राजे अम्ब्रीशराव आत्राम


- पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली :
शासनाच्या गाळमुक्त,  तलाव गाळयुक्त शिवार या योजनेचा लाभ घेऊन शेतात टाकलेल्या गाळामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.  यामुळे शेतकरी सबलीकरण होईल शेतमालाचा  दर्जा वाढून  पिकाला चांगला भाव मिळेल. तसेच तलावातील जलसाठा वाढल्याने गावातील हातपंप आणि विहिरीची जलपातळी वाढण्यास मदत होईल. शासनाने  जलसमृद्धी सोबत शेती सबलीकरणाचे पाऊल  उचलले आहे, याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन   जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव  आत्राम यांनी केले.  
तालुक्यातील तोडसा येथे मामा तलावात दरवर्षी पाणी आटून शेती व पिण्यासाठी पाण्याची टंचाई होत होती.  पण या तलावात पाण्याची पातळी वाढवणे व त्याद्वारे गावकऱ्यानाही लाभ या उद्देशाने अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) संस्था व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या तलावाला गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार या योजनेत समाविष्ट करण्यात आले. तलावातून काढलेल्या गाळाचा शेतात ३ इंचाचा थर टाकून सुपीक जमीन तयार करणे व त्यावर पिक घेणे याबाबत तोडसा येथील शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करण्यात आले.  त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. जून महिन्यात या तलावाचा गळ काढून शेतीत टाकल्याने आज पावसाच्या पाण्याने न भूतो न भविष्यती असा जलसाठा या तलावात निर्माण झाला असल्याने या तलावाचे जलपूजन  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना.  आत्राम यांच्या उपस्थित पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. 
 पालकमंत्री  ना. आत्राम यांनी अनुलोम संस्थेमार्फत जिल्ह्यात झालेल्या गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवारच्या कामची प्रशंसा करत लोकांना योजना मिळवून देण्यासाठी अनुलोम संस्थेचे कार्य उपयोगी असल्याचे सांगत त्यांनी या योजनेच्या लाभार्थ्याचे विशेष कौतुक केले.
 जलपूजन कार्यक्रम निमित्य संपूर्ण तोडसा गावात एकच उत्साहाचे वातावरण होते.  या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी सचिन पानसरे,  नायब तहसीलदार बुराडे, सरपंच प्रशांत आत्राम , अनुलोम संस्थेचे उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार , अहेरीच्या नगरपंचायत अध्यक्ष हर्षाताई ठाकरे,  सभापती उरेते , शाखा अभियंता मुके, अनुलोम चे भाग जनसेवक पंकज नौनुरवार,  वस्ती मित्र राहुल पालकृतीवार,  नवीन बाला,  जनार्धन नळलावर,  सचिन मोताकुरवर , मुकेश नामेवार , रवी नेलकुद्री उपस्थित होते.

 योजनेमुळे तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले : सरपंच आत्राम 

शासनाच्या गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणी मुळे गावातील तलावात आज मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.  त्याचा उपयोग आमच्या गावाला नक्की होईल. माझ्या गावातील लोकांनी व अनुलोम संस्थेने लोकसहभागातून हे काम  पूर्ण केले त्याचे हे यश आज आम्हाला दिसते आहे. 

 योजनेमुळे उत्पादनात वाढ होईल : शेतकरी कुंदन दुर्गे 

गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेतून मी माझ्या शेतात गाळ टाकला.  आज ज्या जमिनीवर गाळ टाकला त्या जमिनीवरील पिकाची फसल गाळ न टाकलेल्या जमिनीपेक्षा खूपच चांगली आहे.  या योजनेमुळे मला फायदा झाला असून यावर्षी माझ्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल अशी प्रतिक्रिया तोड्सा येथील युवा  शेतकरी कुंदन दुर्गे याने दिली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-03


Related Photos