महत्वाच्या बातम्या

 अमृत कलश केला विद्यापीठाकडे सुपूर्द 


- फुले महाविद्यालयात मेरी मिट्टी मेरा देश 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने माझी माती माझा देश हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. देशाचे  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवहानानुसार व गोंडवाना विद्यापीठाच्या निर्देशानुसार प्राचार्य संजय यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. राजकुमार मुसने यांच्या नेतृत्वात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती माझ्या देश उपक्रम घेण्यात आला. स्वयंसेवकांनी आपल्या गावाहून माती संकलित करीत महाविद्यालयात जमा केली महाविद्यालयाच्या वतीने अमृत कलश जनजागृती रॅल काढण्यात आली. लोकांना जनजागृती करीत वीरांना वंदन करण्याच्या ध्यासाने माती संकलित करण्यात आली. 

मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत अमृत कलश कार्यक्रम मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ, त्यांच्या गौरवार्थ तसेच भारतीय जनतेत देश प्रेमाची भावना निर्माण करणे, भारताची राष्ट्रीय एकता, एकात्मता अखंडता अबाधित राखून भारताला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाण्याचा संकल्प म्हणजे मेरी मिट्टी मेरा देश अभियान. या अभियानाबाबत सर्वसामान्य जनतेत जागृती करण्याकरिता महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी तथा शहरातील नागरिक उपस्थित राहून मेरी मिट्टी मेरा देश अभियानाला प्रचंड प्रतिसाद दिला.

जनजागृती अमृत कलश यात्रे अंतर्गत संकलित केलेली मातीचा अमृत कलश माननीय प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी गोंडवाना विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर श्याम खंडारे यांचेकडे सुपूर्द केला. विद्यापीठाच्या वतीने अमृत कलश दिल्ली येथील अमृत सरोवर ठिकाणी स्थापित होणाऱ्या शिलाफलकम येथे पाठवण्यात येणार आले. माझी माती माझा देश या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम आणि वीरांना वंदन करण्याची भावना विकसित करण्यात आली. उपक्रमांमध्ये प्रामुख्याने प्राचार्य डॉक्टर संजय फुलझेले, कार्यक्रम अधिकारी प्रा. राजकुमार मुसणे, डॉ. रवी शास्त्रकार, डॉ. गणेश खुणे, डॉ. भारत पांडे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व निगम वेलादी, लौकिक, विश्वजित, अंजू,प्रवीण, अंशिका, आयुष, रोशनी, सपना, राणी, रिकिता तसेचस्वयंसेवक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos