महत्वाच्या बातम्या

 आ.विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्क्यांनी वाढ


- समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आ.विनोद अग्रवाल यांचे मानले आभार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : आ.विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून परस्पर भेट देऊन समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १०% वाढ करणेबाबत पत्राच्या माध्यमातून निवेदन केले होते. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेऊ असे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांना दिले होते. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या मानधनात १० टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढीचा मार्ग मोकळा झाला असून मागणी मान्य केल्याबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तसेच पाठपुरावा करून विषय निकाली काढल्याबद्दल समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आ.विनोद अग्रवाल यांचे जनसेवा केंद्रात भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. 

यापूर्वी आ.विनोद अग्रवाल यांनी राज्याचे पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले होते की, समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के मानधन वाढ एप्रिल २०२२ पासुन करण्यात यावी परंतु ६ महिन्याची कालावधी लोटून गेला असून कसल्याही प्रकारची वेतनवाढ करण्यात आली नव्हती. यामुळे समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी चा सूर उगवला होता. मात्र आमदार विनोद अग्रवाल यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून फक्त गोंदियाच नव्हे तर राज्यातील तमाम समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ करून आणण्यास यश मिळवले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos