महत्वाच्या बातम्या

 ३ ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे  आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही  दिनानिमित्त  नागरीक व शेतकरी  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार, २ ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने, ३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही   दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे.  जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज १५ दिवसाआधी २ प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, असे तहसिलदार (सामान्य) श्रीधर राजमाने यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos