३ ऑक्टोबरला लोकशाही दिनाचे आयोजन
- लोकशाही दिनात १५ दिवसापुर्वी अर्ज सादर करावे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
३ ऑक्टोबरला होणाऱ्या लोकशाही दिनात नागरिकांना अर्ज करावयाचा असल्यास १५ दिवसापुर्वी विहित नमुन्यात दोन प्रतीत आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले आहे.
लोकशादी दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपिल, सेवाविषयक, आस्थापना विषयबाबी तसेच विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडले अर्ज आणि अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाच्या नसल्यास अशा प्रकारचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha