महत्वाच्या बातम्या

 वन शहीद च्या कुटुंबाला मदत : पालकमंत्रीच्या हस्ते २५ लाखांचा धनादेश सुपूर्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील सुधाकर आत्राम या वनकर्मचाऱ्याचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्या वनशहिदाच्या कुटुंबाला मदतीसाठी धाव घेतली. वन विभागाकडून २५ लाख रुपयांचा धनादेश पत्नी रीना सुधाकर आत्राम व दोन लहान मुलांकडे सुपूर्द केला. 

तालुक्यातील विसापूर येथील सुधाकर बापूराव आत्राम हा गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन विभागात वाहन चालक म्हणून कार्यरत होता. आरमोरी वनपरीक्षेत्रातील कक्ष मध्ये रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला होता. याची माहिती त्या भागातील नागरिकांनी आरमोरी वन परिक्षेत्र विभागाला दिली होती  त्यावेळी वाहन चालक सुधाकर हा वन विभागाचे पथक घेऊन आरमोरी वन परीक्षेत्रातील पळसगाव - डोंगरगाव परिसरात रानटी हत्तींना हुसकावून लावण्यासाठी गेला होता. मात्र वाहनचालक सुधाकर आत्राम हा त्यावेळी एका रानटी हत्त्याच्या तावडीत सापडला. अन वनशहीद झाला. ही दुर्दैवी घटना १६ सप्टेंबर रोजी घडली होती.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारला रात्री ९ वाजता सुधाकरच्या कुटुंबाला भेट दिली. त्यांनी आपल्याच कुटुंबातील एक सदस्य वनशहीद झाल्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली. पिडीत कुटुंबाचे सांत्वन करीत २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी गडचिरोली येथील मुख्य वनवनसंरक्षक रमेश कुमार, वडसा वन विभाग चे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चौव्हाण, तहसीलदार डॉ. कांचन जगताप,  आरमोरी वन परीक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, बल्लारपूर वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, विसापूरच्या सरपंच वर्षा कुलमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम उपस्थित होते.

रानटी हत्तीच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वन विभागातील वाहनचालक सुधाकर आत्राम यांना दोन मुले आहेत. वन विभागातील नवीन शासन निर्णयामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना २५ लाखांची मदत दिली. वनविभागाने ती दिली. मात्र वन कर्मचान्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीला शहीद दर्जा दिल्यामुळे पुन्हा एकदा महिनाभरात दुसरा २५ लाखांचा धनादेश दिला जाणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शाहिद सुधाकर यांच्या एका मुलाला वन विभागात वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर वन विभागात वनरक्षक म्हणून नोकरी दिली जाणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos