महत्वाच्या बातम्या

 शिवसेना युवती सेनेच्या शहरप्रमुखाची पतीने केली हत्या : कुरखेडा तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना शहरप्रमुख राहत ताहेमीम शेख (३०) यांची चाकूने सपासप वार करून पतीने निर्घृण हत्या केली. सदर थरारक घटना १५ सप्टेंबरला पहाटे घडली. चारित्र्याच्या संशयातून सदर थरारक हत्याकांड झाल्याची माहिती असून आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

माहितीनुसार, ताहेमीम वजीर शेख (३८) असे आरोपी पतीचे नाव आहे. तो मूळचा रजेगाव (जि. गोंदिया) येथील आहे. मात्र लग्नानंतर पत्नी राहत शेख समवेत कुरखेडा येथील आंबेडकर वॉर्डात सासरवाडीत राहत होता. त्यांना ८ व ५ वर्षे वयाची दोन आपत्ये आहेत. तो पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत असे. १४ सप्टेंबरला रात्री याच कारणावरून दाम्पत्यात याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. पहाटे अडीच वाजता राहत यांची पतीने चाकूने भोसकून हत्या केली. पोटात, गळ्यावर त्याने निर्दयीपणे वार केले. यात राहत यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी घरात राहत, त्यांचा पती ताहेमीम वजीर व दोन मुले असे चौघेच होते. मुले झोपेत असताना हा थरार घडला.

दरम्यान, तब्येत बरी नसल्याने राहत यांचे वडील नजत सय्यद उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते, त्यांची पत्नीही सोबत दवाखान्यात होती. पहाटे चार वाजता चहा घेण्यासाठी नजत सय्यद हे घरी आल्यावर त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या फिर्यादीवरून ताहेमीम वजीर शेखविरुद्ध कुरखेडा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक वर्षा बोरसे, एस.आर. अवचार तपास करत आहेत.

नदीवर अंघोळ करून गाठले पोलिस ठाणे - 

पत्नीची हत्या केल्यानंतर ताहेमीम वजीर शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत सांगितली. त्यामुळे पोलिसही हादरून गेले. त्याला लगेच अटक करण्यात आली.

१५ दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर - 

ताहेमीम वजीर शेख हा गुन्हेप्रवृत्तीचा आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात त्यास अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता.





  Print






News - Gadchiroli




Related Photos