९ महिन्याच्या बाळाला, वाघाने घरातून उचलून केली शिकारविदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही :
  सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील ९ महिन्याच्या बाळाला वाघाने घरातून उचलून शिकार केल्याची खळबळजनक घटना घडली. राकेश सचिन गुरूनुले असे या बाळाचे नांव असून तो घरी झोपेत असतांना रात्री ३ वाजत्याच्या सुमारास वाघाने घरात घुसून उचलले व धूम ठोकली. बाळाचा आवाज आणि झालेली हालचाल बघून घरचे लोक जागे झाले. मात्र तोपर्यंत वाघाने बाळाला घेऊन जंगलात पळ काढला होता. पायाच्या खुणावरून वाघ असल्याचे लक्षात आल्याने गावकऱ्यांनी ही बाब सिंदेवाही वनपरिक्षेत्र वनविभाग व पोलीसांना कळविली. दोनही विभागाचे कर्मचारी, गावकरी यांनी शोध घेतला असता,  वाकल रोडवर तलावाजवळ  हुळकीवरील बांबूच्या रांजीत छिन्नविछिन्न अवस्थेत ते बाळ आढळले. वाघाने राकेशचा एक पायच तोडून नेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-02


Related Photos