दोन हजारांची लाच स्वीकारल्याने लाईनमॅन एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
वीज मीटर लवकर लावून देण्याकरीता दोन हजारांची लाच मागीतल्याप्रकरणी शांतीनगर नागपूर येथील एनएसडीएल कार्यालयातील लाईनमॅन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
मोहन चंद्रभान  गवते  (४४) असे लाचखोर लाईनमॅनचे नाव आहे. तक्रारकदार हे लालगंज मेहंदीबाग रोड नागपूर येथील रहीवासी असुन भोजनालय चालविण्याचे काम करतो. तक्रारदाराला नविन ईलेक्ट्रीक मीटर घ्यायचे असल्याने तक्रारदार हे कामठी रोड शेरे पंजाब लाॅनच्या बाजुला असलेले एस.एन.डी.एल. कार्यालयात गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी तक्रारदारास शांतीनगर एस.एन.डी.एल. कार्यालयातील लाईनमॅन मोहन चंद्रभान गवते यांना भेटण्यास सांगीतले. तक्रारदार हे शांतीनगर एस.एन.डी. एलकार्यालयातील मोहन चंद्रभान गवते यांना भेटले असता त्यानी तक्रारदारास नविन मीटर लवकरात लवकर लावुन देण्याकरिता दोन हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाईनमॅन  मोहन चंद्रभान गवते यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार नोंदविली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून काल १ जून रोजी सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान लाईनमॅन  मोहन चंद्रभान गवते  लंददप  दोन हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध् पोलीस ठाणे शांतीनगर नागपूर शहर येथे लाचलुचपत प्रतिबंध कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही  पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,  अपर पोलिस अधीक्षक राजेंद्र नागरे , यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक देवेंद्र वंजारी, पोहवा प्रविण पडोळे, नापोशि  प्रभाकर बले, अनिल बहीरे, महिला पोलिस शिपाई शालीनी जांभुळकर, चालक राजेश तिवारी यांनी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-06-02


Related Photos