महत्वाच्या बातम्या

 नियमित पिककर्ज परतफेड करून विविध योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हा अग्रणी बँक प्रबंधकांचे आवाहन


- मोही व खापरी येथे शेतकरी मेळावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे बँकेत परतफेड केल्यास व्याज सवलत योजनेसह बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ त्यांना घेता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिककर्जाची नियमितपणे परतफेड करावी, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंक प्रबंधक चेतन शिरभाते यांनी केले आहे.

बँक ऑफ इंडियाच्या हिंगणी शाखेच्यावतीने सेलू तालुक्यातील मोही व खापरी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया हिंगणी शाखेचे प्रबंधक नवीन चंद्रा, बँकेच्या शाखचे कृषि अधिकारी विद्या इंगळे, मोही ग्रामपंचायतचे उपसरपंच अमर धोटे, खापरी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरेश गव्हाले, ठाकरे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केल्यास व्याज सवलतीसह प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रसंस्करण उद्यम योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या सारख्या बँकेच्या इतर कर्ज योजनांसाठी तसेच योजनेंतर्गत अनुदान करिता देखील पात्र राहतील. यासाठी शेतकऱ्यांनी पिक कर्जाची नियमित परफेड करुन विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेतन शिरभाते यांनी मेळाव्यात केले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सिबिल स्कोर व सिबिल रिपोर्ट बाबत माहिती दिली. तर नवीन चंद्रा यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे महत्व व फायदे समजावून सांगितले. तसेच जे शेतकरी काही कारणास्तव थकीत राहिले त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँकेच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ज्या शेतकऱ्यांनी आपले पिककर्ज नियमित परतफेड केले व पुन्हा उचल केली अशा शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देवून त्यांना गौरवण्यात करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos