येवली प्राथमिक आरोग्य पथकात झाडांनाही सलाईनचा आधार


- रिकाम्या सलाईन बॉटल द्वारे फुलझाडांना पाणी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / डोंगरगाव (येवली) :
जिल्हा मुख्यालयापासून  जवळच  असलेल्या येवली येथील   प्राथमिक आरोग्य पथकात  तापत्या उन्हामुळे पाण्याची कमतरता भासत आहे.  पाण्याचा  अवाढव्य वापर न करता  प्राथमिक आरोग्य पथक येवली येथील डॉ. स्मिता देवगडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी झाडे जगविण्यासाठी नवीन शक्कल लढविली आहे. रिकाम्या सलाईन बॉटल द्वारे फुलझाडांना पाणी देऊन नवसंजीवनी दिली आहे. 
प्राथमिक आरोग्य पथकात दररोज रुग्णांना सलाईन लावले जातात. यामुळे  कीत्येत खाली झालेल्या सलाईन च्या बॉटल फेकून न देता  प्राथमिक आरोग्य पथकातील  परिसरात असलेल्या बागेत खाली झालेल्या सलाईन च्या बॉटल मध्ये पाणी भरून फूल झाडांना पाणी घालण्याचा  उपक्रम सुरु केला. यामुळे पाण्याची बचत होत असून झाडे टवटवीत दिसत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात झाडे हिरवीगार आहेत. बॉटलद्वारे पाणीसुद्धा आवश्यक  तेवढेच दिले जात असल्याने पाण्याची नासाडी सुद्धा टळली आहे.  नियमित पाणी मिळत असल्यामुळे  जणू काही फूल झाडांचा  पुनर्जन्म होत असल्याचे दिसते. गावातील लोकांनी या  उपक्रमाला पाहुन  वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-22


Related Photos