महत्वाच्या बातम्या

 पोलीस पाल्यांकरिता, सेवानिवृत्त पोलीसांच्या पाल्यांकरिता व गृहरक्षकांच्या पाल्यांकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन


- वर्धा जिल्हा पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : पोलीस मुख्यालय येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्हा पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस पाल्यांकरीता, सेवानिवृत्त पोलीसांच्या पाल्यांकरीता, गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता २५ ऑगस्ट २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी रामदास तडस, खासदार, लोकसभा वर्धा जिल्हा मतदारसंघ, वर्धा यांचे हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक वर्धा नूरुल हसन व उपाध्यक्ष डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, ईला हायरिंग टेक्नोलॉजीचे संचालक अंकित हिवरे यांचे उपस्थीत करण्यात आले.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. वर्धा जिल्हा नागपूर जिल्हयातील नामांकीत कंपन्या स्टेट बॅंक ऑफ इंडीया, इरॉस हयुदई, ॲबको कॉम्पुटर, आरोही इंन्फो, वी-फलायओरीयस टेक्नोलॉजी, एलआयसी, पटेल एंडस्कील फाउंडेशन, धूत ट्रांसमिशन, ईला हायरिंग टेक्नोलॉजी इत्यांदी उमेदवारांचे साक्षात्कार घेवून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. 

कार्यक्रमाअंती नूरुल हसन यांनी निवड झालेल्या एकुण ८० उमेदवारांची या रोजगार मेळाव्यादरम्यान विविध कंपन्यांद्वारे निवड झालेली असून २८ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप केल्या गेले व इतर ५२ उमेदवार यांची अंतिम निवड कंपनीचे संचालकाकडुन होणाऱ्या मुलाखाती करीता राखुन ठेवण्यात आलेली आहे.   

ज्या उमेदवारांची काही कारणास्तव निवड होवू शकली नाही, अशांना सुध्दा आजचा अनूभव गाठीशी ठेवून पुनश्च नवीन जोमाने व हिम्मतीने तयारी करण्याकरीता नूरुल हसन साहेब यांनी प्रोत्साहीत केले.  

वर्धा जिल्हा पोलीसांचे पाल्याकरीता असा रोजगार मेळावा घेण्यात आल्याची ही प्रथमच वेळ असून असा रोजगार मेळावा दरवर्षी व्हावा अशी मागणी पोलीस विभागातील परिवारांकडून होत आहे. पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे पाल्यांना नोकरी मिळाल्यास ते सुध्दा निश्चिंत होवून आपले शासकीय कर्तव्य चांगल्या प्रकारे करू शकतात. असे मनोगत पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, सपोनि. संदिप कापडे व कर्मचारी सायबर शाखा, वर्धा, सपोनि. लक्ष्मण लोकरे, व कर्मचारी पोलीस कल्याण शाखा, वर्धा यांनी प्रयत्न केले. रोजगार मेळाव्याकरीता उपरोक्त कंपनीचे प्रतिनिधी व एकुण ३०३ उमेदवार यांनी उपस्थीती नोंदविली. 





  Print






News - Wardha




Related Photos