एक्झिट पोल नंतर शेअर बाजारात तेजी, ९५० अंकानी उसळला सेन्सेक्स


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. आज सकाळी मार्केटने ९०० अंकांनी उसळी घेतली आहे तर निफ्टीही २०० अंकांनी वधारला आहे. या बढतीमुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाही ६९ पैशांनी मजबूत झाला आहे. 
लोकसभेच्या ५४२ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान रविवारी पार पडले. मतदान संपल्यावर विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या पोल्सने भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवले आहेत. साधारण २८७ ते ३४० जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोल्सचे निकाल जाहीर झाल्यावर आज सकाळी साडेनऊ वाजता शेअर मार्केटने सुरू होताच उचल खालली होती. शुक्रवारी सेन्सेक्सचा निर्देशांक ३७, ९३०.७७ अंशांवर बंद झाला होता. आज सकाळी ९४६ अंकांची उचल खात ३८,८२९ अंकांवर पोहोचला. शुक्रवारी ११, ४०७.१५ अंकांवर बंद झालेला निफ्टी २० अंकांनी वधारला आहे. एकूण ५० कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. तर काही कंपन्यांचे शेअर्स घसरले देखील आहेत. एक्झिट पोल्समध्ये जरी भाजपला बहुमत मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी २३ ला वेगळे निकाल जाहीर होऊ शकतात याची गुंतवणूकदारांना कल्पना आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अत्यंत सावधपणे शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत.   Print


News - Rajy | Posted : 2019-05-20


Related Photos