लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी ५९ जागांवर मतदानाला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज उमेदवार रिंगणात


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली  : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी ५९ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. या जागांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी या मतदारसंघाचाही समावेश आहे. याशिवाय, शत्रुघ्न सिन्हा यांचा पाटणा साहिब, सनी देओल यांचा गुरदासपूर हे मतदार संघ देखील महत्त्वाचे मानले जात आहेत. 
रविवारी ८ राज्यांतील ५९ जागांवर मतदान होत आहे. १०.१७ कोटी मतदार ९१८ उमेदवारांचे भाग्य इव्हीएममध्ये बंद करणार आहेत. १.१२ लाख मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पंजाब (१३), उत्तर प्रदेश (१३), पश्चिम बंगाल (९), बिहार (८), मध्य प्रदेश (८), हिमाचल प्रदेश (४), झारखंड (४), चंदीगड (१) या राज्यांत मतदान होत आहे.  



  Print






News - World | Posted : 2019-05-19






Related Photos