महत्वाच्या बातम्या

 अभिव्यक्ती मताची स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


- स्पर्धा नियोजनाबाबत सभेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने भव्य मताची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय अभिव्यक्ती मताची असून या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्यासाठी स्पर्धेच्या नियोजनसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला जिल्ह्यातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशिल कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

स्पर्धेच्या नियोजनाकरीता विकास भवन येथे २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.

स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांव्दारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करुन घेण्याकरीता अभिव्यक्ती मताची या विषयावर जाहिरात निर्मिती, भिंतीपत्रक आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे.

स्पर्धेमध्ये राज्यातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मिडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धा १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार असून तीनही स्पर्धाचे विषय व नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचा विषय युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका व जबाबदार आणि लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार असून या तीनही स्पर्धाचे माध्यम मराठी, हिंदी व इंग्रजी आहे.

स्पर्धेसाठी जाहिरात निर्मिती करीता प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, व्दितीय ७५ हजार रुपये व तृतीय ५० हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी १० हजार रुपये, भिंतीपत्रक स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ५० हजार रुपये, व्दितीय २५ हजार रुपये व तृतीय १० हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ हजार रुपये व घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, व्दितीय १५ हजार रुपये व तृतीय १० हजार रुपये आणि उत्तेजनार्थ दोन पारितोषिक प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos