महत्वाच्या बातम्या

 हर घर तिरंगा व मेरी मिट्टी मेरा देश अभियानाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने विविध कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यानुसार, संपूर्ण देशात व राज्यात हर घर तिरंगा व मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी को नमन विरों का वंदन) अभियान राबविण्यात येत आहे.

या उपक्रमानुसार प्रत्येक गाव ते शहरापर्यंत सदर अभियानाबाबत जनजागृती व साक्षरता निर्माण व्हावी या अनुषंगाने,  ७ ते १२ ऑगस्ट २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व शाळांमध्ये गटनिहाय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, स्लोगन स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धांचा समावेश आहे.  त्यासोबतच या अभियानांतर्गत सर्व शाळांमधून १२ ऑगस्ट रोजी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे यांनी कळविले आहे.

सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन : हर घर तिरंगा आणि मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत प्रत्येक गावात जनजागृती व साक्षरता निर्माण व्हावी, यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रात जाणीव जागृती निर्माण करणे व त्याचप्रमाणे अभियानाला व्यापक प्रसिद्धी मिळून जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ८२५ ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या अंतर्गत जिल्ह्यातील ८२५ ग्रामपंचायती मध्ये शासनाने दिलेल्या पंचसुत्री अंतर्गत ध्वज उभारायचा आहे. ध्वजासोबत सेल्फी घेणे, वसुधा वंदन अतंर्गत प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे, विरों का वंदन अंतर्गत स्वांतत्र्य सैनिकांना नमन करणे व १५ ऑगस्ट रोजी शिलाफलकम ऊभारून राष्ट्रगिताचे गायन करावयाचे आहे.

देशासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक, प्रत्येक सैन्य आणि निमलष्कराशी निगडित लोकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय, प्रत्येक गावात ७५ झाडे लावण्याचा कार्यक्रमही होणार आहे, असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos