महत्वाच्या बातम्या

 महानगरातील ३ हजार ३०० पूरग्रस्त परिवाराला मिळाली आर्थिक मदत


- पालकमंत्री मुनगंटीवार यांचे तडकाफडकी निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जुलै महिन्यात अतिवृष्टीमूळे जिल्ह्यात हाहाकार माजला. यात चंद्रपूर महानगर पण पावसाने कवेत घेतले. अतिवृष्टी व बॅक वाटरने अनेकांच्या घरात शिरकाव केला. अश्या पुरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करून त्यांना तातडीची मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. यासंदर्भातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून आता पर्यंत ३ हजार ७०० कुटुंबापैकी ३ हजार ३०० कुटुंबांना ५ हजार रु. प्रति कुटुंब मदत देण्यात आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. विशेष म्हणजे ना.मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात महानगर भाजपाने पुरग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना सुरक्षित स्थळी पोहचविले होते. हेच नाहीतर सर्व्हेक्षण दरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनालाही मदतीचा हात दिला. यामुळे अल्पावधीतच पूरग्रस्तांना मदत मिळाली.





  Print






News - Chandrapur




Related Photos