खासदार अशोक नेते यांच्या सहकुटुंबियांनी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची घेतली भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात खासदार अशोक नेते व सहकुटुंबियांनी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली. या कौटुंबिक भेटीत त्यांच्यासोबत पत्नी सौ.अर्चना, मुली अक्षता, आणि अक्षिता तथा मुलगा अर्णव उपस्थित होते.
यावेळी महामहिम राष्ट्रपतीनीं कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटी दरम्यान खासदार अशोक नेते यांनी ५ जुलै ला गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीचा भूमिपूजन व दीक्षांत समारोह कार्यक्रम समारंभाला आपण आलो. स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने गडचिरोली सारख्या आदिवासी, बहुल आकांक्षीत, अविकसित नक्षलग्रस्त प्रभावी, गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रपती पहिल्यांदाच आल्या हे एक इतिहासातील पहिलीच घटना झाली त्यामुळे आपण आल्याबद्दल आनंद द्विगुणित झाला त्यासाठीआपले मनापासून धन्यवाद मानतो. असेच सहकार्य व प्रेम सदैव असुद्या अशी अपेक्षा व्यक्त करतो.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी अविकसित, आंकाक्षित, नक्षलग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्यांच्या भौगोलीक, सार्वांगीक विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत अशी चर्चा केली.
News - Gadchiroli