शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात आढळला युवकाचा मृतदेह : राजुरा येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / राजुरा :
राजुरा येथील आसिफाबाद रोड वर असलेल्या शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात आज सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना युवकाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. इंदिरा नगर परिसरात राहणारा संदेश रवी ठाकुर (१६) हा युवक काल जेवण करून रात्री १०. ३० वाजताच्या सुमारास फिरायला गेला. रात्रभर मुलगा घरी न आल्यामुळे सकाळी पालकांनी शोधाशोध सुरू केली असता त्यांना सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांकडून कडून युवकाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती मिळाली असता  मुलाची आई, आजी व बहिण घटनास्थळी पोहोचल्या असता त्यांना संदेश ठाकुर ह्याचा मृतदेह आढळला. मृतकाच्या डोक्याच्या मागील भागात घाव असुन कानातून रक्त निघाल्याचे दिसत आहे तसेच शरीरावर जखमाही आढळून आल्या. तसेच त्याच्या शरीरावर मोबाईल सुद्धा ठेवलेला आढळला आहे . पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेतला असुन ठाणेदार बाळू गायगोले यांच्या मार्गदर्शननात पुढील तपास सुरू आहे. आधीच राजुरा शहर लैंगिक अत्याचार प्रकणात देशभर गाजत असून, दररोज नव नवीन गुन्हेगारीच्या घटना उजेडात येत शहरातील नागरिक शासन-प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उभे करीत आहेत.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-29


Related Photos