महत्वाच्या बातम्या

 घोडाझरी कालवा नहाराची दुरावस्था : रस्ता दुरुस्त करण्याची जनतेची मागणी


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ते गडबोरी वितरीके पर्यंत ब्रिटीश कालीन निर्मीत घोडाझरी तलावाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी नहराद्वारे सोडल्या जाते. या येणाऱ्या नवरगांव नहरावरून रत्नापूर येथील जनतेच्या शेताला पाणी मिळावे, म्हणून रत्नापूर मायनर सोडला जातो. 

परंतु सदर नहर हा पूर्णपणे कचऱ्याने व्यापलेला असुन वरच्या भागाला जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत. नहरात कचरा असल्यामुळे पाणी येण्यास अडचन होते. तर वरच्या भागावरून शेतकरी जनतेला जाणेयेणे करावे लागते. आपल्या शेतीच्या कामाचे अवजारा सह जाणे येणे करावे लागते. परंतु जागोजागी खड्डे असल्याने शेतकरी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

आता नहरानी पाणी येण्याची वेळ झाली असली तरी अजुन पर्यंत नहर साफ केलेला नाही. त्यामुळे संबधीत घोडाझरी विभागाप्रती शेतकरी जनतेच्या मनात असंतोष पसरला असुन यात संबधीत विभागाचा गलथानपणा कारणीभुत आहे. 

तरी निर्मान झालेल्या शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे घोडाझरी विभाग कर्मचारी यांनी लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी जनतेनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos