छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक : दोन नक्षल्यांचा खात्मा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था  / रायपूर :
छत्तीसगडमधील धनिकरका येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी आज १८ एप्रिल ला चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.
छत्तीसगडच्या कुआकोंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धनिकरका वन क्षेत्रात आज ही चकमक झाली. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर चकमकी दरम्यान एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला आहे. सकाळी  सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु असताना काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून त्यामध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर वर्गीसचा समावेश आहे. वर्गीसवर पाच लाखांचे बक्षिस होते.   Print


News - World | Posted : 2019-04-18


Related Photos