महत्वाच्या बातम्या

 युवास्पंदन विद्यालय कोरची येथे शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : इथून ५ किमी अंतरावर असलेल्या भिमपूर येथील युवास्पंदन विद्यालयात सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे धनादेश आज वाटप करण्यात आले. युवास्पंदन विद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा टेंभुरकर होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संस्थापक शालिकराम कराडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालचंद गायकवाड होते.

यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते हे विशेष. मागील तीन वर्षे कोरोनात गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला. या शाळेत ई. ८ ते १०वर्ग असल्याने मुले नव्याने ८ व्या वर्गात येतात. त्यांना इंग्रजी बाराखडी बरोबर येत नाही. त्यामुळे त्यांना बरोबरीत आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

असे मुख्याध्यापिका सुषमा टेंभुरकर म्हणाल्या. यावेळी संस्थापक शालिकराम कराडे, लालचंद गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. वर्ग शिक्षकांनी सुध्दा मुलांबाबत आणि आपण शाळेत कशे अध्यापन करतो ते सांगितले. यावेळी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos