महत्वाच्या बातम्या

 न्यायमूर्ती यांच्या उपस्थितीत पार पडला शासकीय निवासस्थान तसेच उपपोस्टे झिंगानूर येथील नवीन प्रशासकिय ईमारतीचे उद्घाटन व जनजागरण मेळावा


- पहील्यांदाच न्यायमुर्ती यांनी गडचिरोली येथील दुर्गम-अतीदुर्गम भागास दिली भेट. 

- भर पावसाच्या वातावरणातही उपपोस्टे झिंगानूर येथील जनजागरण मेळाव्यात लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद. 

- जनजागरण मेळाव्यास ८०० ते ९०० नागरिकांनी लावली हजेरी. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आज २२ जुलै २०२३ रोजी पोलीस संकुल, अहेरी येथील नवीन शासकिय निवासस्थानाचे उद्घाटन तसेच उपपोस्टे झिंगानूर येथील नवीन प्रशासकिय ईमारतीचे उद्घाटन व गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी चे माध्यमातून गडचिरोली जिल्हयातील जनतेचे जीवनमान उंचवण्याच्या उद्देशाने उपपोस्टे झिंगानूर येथे आयोजित करण्यात आलेला जनजागरण मेळावा न्यायमुर्ती सर्वोच्च न्यायालय, दिल्ली भूषण गवई यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी उपविभाग सिरोंचा अंतर्गत उपपोस्टे झिंगानूर हद्दीतील ८०० ते ९०० च्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. सुरुवातीला आदिवासी पारंपारिक रेला नृत्यासह मान्यवरांचे कार्यक्रमास्थळी आगमन होताच नवीन प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित आदीवासी बांधवांना कार्यक्रमास्थळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यात शिलाई मशीन, स्प्रे पंप, विद्यार्थ्यांना नोटबुक, पुस्तके, छत्री, क्रिकेट बॅट-बॉल, स्टंप-बेल्स, व्हॉलीबॉल, व्हॉलीबॉल नेट तसेच महीलांसाठी साड्या व मुलींना सायकल इत्यादी साहीत्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच उपस्थित नागरिकांना जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला इ. शासकिय कागदपत्राचे सुद्धा वाटप करण्यात आले. तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकाकडुन अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने नक्षलविरोधी भूसुरूंगाबाबत जी कारवाई केली जाते याबाबतची माहीती उपस्थित मान्यवरांनी जाणून घेतली.

सदर कार्यक्रमात न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय, दिल्ली भूषण गवई यांनी उपस्थित सर्व आदिवासी बांधवांना आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगीतले की, लोकशाही सशक्त करण्यास गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम हे अधिक स्तुत्य असून दुर्गम अतिदुर्गम भागात राहत असलेल्या नागरिकांचा विकास होत आहे. याबाबत गडचिरोली पोलीस दलाचे काम प्रशंसनिय आहे. तसेच येथील विद्यार्थ्यांनीही शिक्षणाच्या मार्ग अवलंबुन आपल्या भागाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये गडचिरोली पोलीस दल राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहीती दिली.

आतापर्यंत गडचिरोली प्रशासनाकडून पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक ५५१, नर्सिंग असिस्टंट १ हजार २३७, हॉस्पिटेलिटी ३२३, ऑटोमोबाईल २७६, ईलेक्ट्रीशियन २०१, सेल्समैन ०५, प्लंम्बिंग ३५, बेल्डींग ३८, जनरल ड्यूटी असिस्टंट ३८४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलइ ५२ असे एकूण ३ हजार २६८ गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांच्या मार्फत ब्यूटीपार्लर १७४, कुक्कुट पालन ५८५, बदक पालन १०० शेळी पालन २७७ शिवणकला २७७, मधुमक्षिकापालन ५३, फोटोग्राफी ६५ सॉफ्ट टाईज ३५, एमएससीआयटी २३१, वाहन चालक ५१२, भाजीपाला लागवड १ हजार ३४५, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण १ हजार ६२, टू व्हिलर दुरुस्ती १३४, मत्स्यपालन ११२, वराहपालन १०, फास्ट फुड १३०, पापड लोणचे ५९, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकूण ५ हजार २३९ युवक/युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे..

सदर कार्यक्रमास न्यायगुती उच्च न्यायालय, मुंबई अतुल चांदुरकर, न्यायमुर्ती उच्च न्यायालय, मुंबई संजय मेहरे, न्यायमुती उच्च न्यायालय, मुंबई महेंद्र चांदवाणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली उदय शुक्ल, पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीणा, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली सुदर्शन राठोड व उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिंदे हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले असून आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिंदे, उपपोस्टे झिंगानूरचे पोउपनि, देविदास झुंगे, पोउपनि घुगे व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार तसेच चीडीडीएस चे पोउपनि भुषण पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos