महत्वाच्या बातम्या

 आष्टी येथे तालुकास्तरीय माजी सैनिकांची बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने माजी सैनिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आष्टी येथे तहसिलदार सचिन कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला.ले.धनंजय सदाफळ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बैठकीमध्ये तहसिलदार सचिन कुमावत यांनी माजी सैनिकांकरीता असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्यांच्या विविध समस्यांचे समाधान केले. तसेच माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या अडचणी, तक्रारी  प्राप्त झाल्यास त्या प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. दर सहा महिन्यांनी बैठक घेण्याच्या सूचना सुध्दा यावेळी त्यांनी केल्या.

तहसिल कार्यालय येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीला आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस कॅान्स्टेबल नंदकिशोर वाढवे, अशासकीय सदस्य माजी सैनिक रिजवान अहमद, रमेश दडाळे, अशोक विजयकर आदी उपस्थित होते, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.






  Print






News - Wardha




Related Photos