शिक्षकांचे मनोबल खच्ची करण्याचे कारस्थान हाणून पाडू


- शिक्षक समितीचा इशारा
- गटशिक्षणाधिकाऱ्यांना  घेराव , समस्या निवारणार्थ केली चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
शिक्षकांचा अपमान आणि मनोबल खच्ची करण्याचे कारस्थान हाणून पाडू, असा इशारा शिक्षक समितीने पंचायत समिती प्रशासनाला दिले आहे.
शिक्षक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबमत कुरखेडा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षक समितीने घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. संवर्ग विकास अधिकार्यांना प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या शिष्टमंडळास चर्चेसाठी आमंत्रित केले.
शिक्षण विभागाला एक ज्येष्ठ लिपीक व एका कनिष्ठ लिपीकाची तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, शिक्षकांचे मनोबल खच्ची करण्याचे कारस्थान प्रशासनाकडून होवू नये, सातवा वेतन आयोगाची वेतन निश्चिती करून मार्च महिन्याचे वेतन सुधारित दराने मिळावे, स्थायी, नियमित व निवड श्रेणी मिळालेल्या शिक्षकांच्या नोंदी सेवा पुस्तकात त्वरीत घेण्यात याव्यात, मुख्याध्यापक अथवा शिक्षकांनी दिलेल्या डाक गहाळ करणाऱ्या लिपीकावर कारवाई करण्यात यावी, प्रलंबित प्रवास देयके मार्च अखेर मंजूर करण्यात यावे, सेवा पुस्तकांच्या नोंदी अद्यावत करण्यासाठी निवडणूक नंतर कार्यशाळेचे आयोजन करावे आदी मागण्या करण्यात आल्या.
प्रशासनाच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी मेश्राम, गटशिक्षणाधिकारी रविंद्र शिवणकर, कक्ष अधिकारी रोहणकर, कनिष्ठ लिपीक मसराम उपस्थित होते. यावेळी शिक्षक संघटनेचे प्यारेलाल दाउदसरीया, अनिल उईके, ज्ञानेश्वर बांडे, गुलाब सोनकुकरा, लिलाधर वाढई, नरेश बन्सोड, संजय कोडवते, मुरलीधर पुस्तोडे, सुभाष गणोरकर, धनराज दुधकुंवर, तुळशिराम दखणे, प्रदिप कांबळे, दीपक पिलेवान, नरेश मांडवे, गिरीधर शिंगाडे, जुरेशिया, दिगांबर कुळमेथे यांच्यासह तालुक्यातील विविध केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-30


Related Photos