तळेगाव येथील विहिरीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात : १९ जणांना रुग्णालयात हलविले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी /  कुरखेडा :
तालुक्यातील तळेगाव येथील एका खासगी विहिरीच्या दुषित पाण्याच्या वापरामुळे अनेक जणांना उलटी, हगवण, मळमळ सुरू झाल्याने १९ जणांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर काही जणांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 
 तळेगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा नळयोजनेची पाईपलाईन फुटल्याने आठ दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने येथील सार्वजनिक विहीरी, हातपंप व खासगी विहिरीचा पाण्याचा नागरिकांकडून वापर सुरू आहे . मात्र येथिल जलरक्षक सुभाष गद्देवार हेतुपुरस्सर विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकत नसल्याचे यावेळी नागरिकांकडून आरोप करण्यात येत आहे . 
 दरम्यान आज सकाळी येथील वामन उईके यांच्या खासगी विहिरीच्या पाण्याच्या वापरामुळे अनेकांना उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाल्याचे समजताच सरपंच शशिकला कुमरे यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे  . 
 यामध्ये दिपक नैताम (३२) ,सुरेखा नैताम (२०), वाहलू सहारे (५८)  , अमित दाणे (२१) ,सुनंदा नैताम (६०) ,कामुना मलकाम (६५) , जानिका मलकाम (१४) ,शीला नैताम (६८), करुणा नैताम (४०) ,भुपेश उईके (२७) ,चांगेश उईके (२९)  ,शशिकला मडावी (६२) , मचिंद्रनाथ जुमनाके (२३) ,निर्मला राऊत (४०) ,रीना जुमनाके (२९) ,विद्या राऊत (३०) ,हर्षा उईके (४०) ,ज्योत्स्ना राऊत (१९) , हिरा जुमनाके (४५) यांचा समावेश आहे. 
 घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश दामले यांनी तळेगाव येथे वैद्यकीय चमु पाठविली असल्याचे डॉ. दामले यांनी सांगितले. 
   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-24


Related Photos