गेवर्धा- केशोरी मार्गावरील खैरीफाट्याजवळ कुरखेडा पोलिसांनी केली लाखोंची दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
  गोंदिया जिल्हयातून गेवर्धा मार्गे अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या  चारचाकी वाहनातून  २८ पेटी देशी दारू जप्त करण्यात आली आहे. कुरखेडा  पोलिसांनी कारवाईत कारसह ५ लाख ४० हजार रूपयाचा मूद्देमाल  पोलीसानी जप्त केला  आहे. सदर कार्यवाही आज २० मार्च रोजी पहाटे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान  गेवर्धा- केशोरी मार्गावरील खैरीफाट्याजवळ करण्यात आली. 
कारवाईदरम्यान आरोपी वाहन चालक अंधाराचा  फायदा घेत जगंलाच्या  दिशेने पळून गेला.  मात्र घटनास्थळी  संशयास्पदरीत्या अंधारात फीरत असलेल्या व अवैध व्यावसायिकांना पोलीसांच्या   गुप्त हालचालीची माहीती देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
 गोंदिया जिल्हयातून तालूक्यातील गेवर्धा मार्गे जिल्ह्यात इतरत्र चारचाकी वाहनाने अवैध दारूचा पूरवठा होत आहे, अशी गोपनिय माहीती ठाणेदार सूरेश चिल्लावार याना मिळाली. त्यानी रात्री पासूनच या मार्गावर   सापळा रचला होता.   वाहन क्र एम एच २७ बी ई १०४३ दृष्टीपथात येताच वाहन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला . यावेळी पोलीसांची कूणकूण लागताच आरोपीनी वाहन जंगलातच सोडत पळ काढला.  यावेळी गेवर्धा येथील व्यंकट सनकू पूराम  (४९) हा घटणास्थळाजवळ जगंलात संशयास्पदरीत्या अंधारात फीरत असल्याचे आढळून आले . त्याला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली.  यावेळी पोलीसांच्या  गुप्त हालचालीची माहीती  अवैध व्यावसायीकाना तो पूरवित असल्याचे आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. मु  दा का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणातील फरार आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे . सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांचा नेतृत्वात साहायक पोलीस निरीक्षक एस आर केदार,  पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर,  हवालदार रमेश बगमारे,  दलपत मडावी,  मनोहर पूराम,  निरंजन जाधव,  रघुनाथ हिडामी,  भरत डांगे यानी केली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-20


Related Photos