महत्वाच्या बातम्या

 कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्य पंचायत समिती सभागृह कोरची येथे कृषी दिन साजरा


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्य पंचायत समिती सभागृहात कोरची येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.

यात मुदतीत सिंचन विहिरी चे बांधकाम करून आपल्या उत्पादनात वाढ करणाऱ्या बोडेणा येथील शेतकरी शिवेंद्र कुंजाम तसेच तृणधान्य, कडधान्य व गडीताचे धान्य पिक स्पर्धा २०२२-२३ या वर्षात प्रथम पुरस्कार जगदीश काळेंगे, द्वितीय पुरस्कार सुरेश घोडाम, तृतीय पुरस्कार सिताराम कोतेंगे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले व तालुक्यातील शेतकरी यांना विविध कृषी विषयक योजनांची माहिती, कृषीचे नवनवीन तंत्रज्ञान तसेच उत्पादन वाढीकरिता विविध कार्यपद्धती ची माहिती देण्यात आली. 

खते, बी बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा योग्य वापर करण्याबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी राजेश फाय प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी विद्या मांडलिक, कृषी अधिकारी रेणुका दुधे होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी कृषी देवानंद फुलझेले यांनी केले तर आभार कृषी पर्यवेक्षक ध्यानेश्वर मसराम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रजनीश पंचभाय, विनोद गडपायले, दिगंबर पेंटेवाड, राहुल कोपुलवार, विनोद चोरे, शीतल साळवे, प्रभाकर बावनकर, राहुल मुलकलवार, उमेदच्या सुशीला सुपी, अर्चना उंदीरवाडे, सुलोचना उंदिरवाडे, धीरज ढवळे यांनी सहकार्य कार्यक्रमात मोठया प्रमाणात तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos