महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर नगरपरिषदेच्या शाळांची माहिती देण्यास व शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यात हलगर्जीपणाच्या तक्रार



- आम आदमी पार्टीचे नगरपरिषदचे मुख्याधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : ३० जून रोजी शहराध्यक्ष रविकुमार लता पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी बल्लारपुर तर्फे नगरपरिषद बल्लारपूर अंतर्गत येणाऱ्या विद्यालयामध्ये सुधारणा व्हावे या अनुषंगाने पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले आहे. आता पर्यंत सात वेळा निवेदन व तीन वेळा अधिकारी समवेत बैठक झाली. सतत निवेदन, अधिकाऱ्यांशी बैठक व शाळेच्या निरक्षणाच्या माध्यमातून शाळेतील सोय-सुविधा, शालेय व्यवस्थापन, शैक्षणिक स्तर सुधारणा, विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध करण्याकरिता प्रयत्न व्हावे अशी आम आदमी पार्टी बल्लारपुरात नेहमीच मागणी करित आहे. या संदर्भात नगरपरिषद द्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनां बाबत शाळा व्यवस्थापन समितीची लिखित स्वरूपात माहिती देण्यात यावे. पटसंख्या वाढविण्याबाबत उपाययोजनेची लिखित स्वरूपात माहिती देण्यात यावे. 

शैक्षणिक साहित्य व क्रीड़ा साहित्य उपलब्ध करुन देने संदर्भात लिखित माहिती देण्यात यावे.  इंग्रजी बालवाड़ी संबंधित संपूर्ण लिखित स्वरूपात माहिती देण्यात यावे. नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या १३ प्राथमिक शाळेत एकूण ५२ वर्ग आहेत आणि १ माध्यमिक शाळेत एकूण १० वर्ग असून वर्गनिहाय शिक्षक व वर्गखोल्या उपलब्ध करून द्याव्या अश्या मागण्या आहे. वरिल संदर्भ नमूद असलेली शाळेची माहिती पुरविण्यास नगरपरिषद हलगर्जीपणा करत आहे. अशी तक्रार जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. या विषयावर आवर्जुन लक्ष देण्यात यावे व मागणीची पूर्तता करून हि माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून शिक्षण व्यवस्था सुधारनेकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा संघठन मंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, अफज़ल अली, प्रा. प्रशांत वाळके, सचिव ज्योति बाबरे, प्रवक्ता आसिफ शेख, महिला अध्यक्षा किरण खन्ना, विधि सल्लागार ॲड. सुमित आमटे, सुदाकर गेडाम, सतीश श्रीवास्तव,  स्मिता लोहकरे, नलिनी जाधव, जमीला शेख सह इत्यादि उपस्थिति होते.  





  Print






News - Chandrapur




Related Photos