महत्वाच्या बातम्या

 स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनु. जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमीत्त केंद्र शासनाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना आणली आहे.

महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अन्वये जिल्हयतील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील १८ वर्षावरील नवउद्योजक यांना १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित सबसिडी च्या अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या १५ टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येते. यासाठी प्रकल्प कर्ज मंजुर पात्र इच्छुक नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क करावा, असे अवाहन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

 





  Print






News - Bhandara




Related Photos