महत्वाच्या बातम्या

 विधानसभा निवडणुक प्रमुख चंदन सिंह चंदेल यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : चंदन सिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांचे भारतीय जनता पार्टी बल्लारपूर विधानसभा  निवडणुक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आले.

१५ जून रोजी भाजपा जनसंपर्क कार्यालय, बल्लारपूर येथे भाजपा बल्लारपूर, भाजपा महिला आघाडी, भाजयुमो व अन्य आघाडी च्या वतीने भारतीय जनता पार्टी चे शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील चंदन सिंह चंदेल यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एक नवीन उत्साह आणि ऊर्जेचा प्रवाह प्रत्येक भाजपा कार्यकर्ता मध्ये दिसून आला. कार्यकर्ता हाच संघटन चा पाया आणि शक्ती असते या धोरणाने सदैव मागील ५५ वर्षापासून चंदन सिंह चंदेल आपल्या राजकीय जीवनात कार्यरत असलेले मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व या अतिशय संवेदनशील पदी नियुक्ती झाल्याचा आनंद व भावना प्रत्येक उपस्थियांच्या मनात आणि संवाद यातुन प्रकट होत होता. याप्रसंगी भाजपा शहर पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका, शक्तिकेंद्र आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos