अतिक्रमीत शेतजमीन शासनजमा करण्याच्या न्यायालयाच्या निकालाविरोधात फेरविचार याचीका दाखल करावी


- शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
- उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
  सर्वोच्च न्यायालयाने एका याचीकेवर सुनावणी करताना  शेतकऱ्यांच्या  फेटाळण्यात आलेल्या वनहक्क दाव्यातील अतिक्रमीत शेत जमीन ताब्यात घेण्याचे आदेश शाशनाला दिले आहे.  या आदेशाने पीढ्यानपीढ्या पासून कसत असलेल्या अनेक शेतकऱ्यांची अतिक्रमीत शेतजमीन शासन जमा होत त्यांच्या  उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.  त्यामुळे राज्य शाशनाने या निकाला विरोधात तातडीने फेरविचार याचीका दाखल करावी व न्यायलयात सक्षमतेने शेतकऱ्यांची बाजू मांडावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी शेन्डे यांच्यामार्फत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 
वन व वन्य जीव प्रेमी काही स्वंंयसेवी संस्थानी सन २००८ मध्ये वनजमीनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती . या याचीकेवर अंतीम सूनावणी करताना न्यायलयाने २१  फेब्रुवारी २०१९ रोजी वनहक्काचे पट्टे नाकारण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची अतिक्रमीत शेतजमीन शासन जमा करावी , प्रसंगी बळाचा वापर करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत.  त्यामूळे शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे . अनेक पीढी पासून कसत असतानाही काही शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचे वन हक्क दावे तांत्रिक अडचणी मूळे किंवा गावातील हेवेदावे राजकिय वैर आदि कारणामूळे नाकारण्यात आले अथवा प्रलंबीत आहे.  या शेतकऱ्यांवर या आदेशाने मोठा आघात होणार आहे.  याबाबीची दखल घेत राज्य शासनाने न्यायलयीन आदेशाची अमलबजावणी करण्यापूर्वी न्यायलयात फेरविचार याचीका दाखल करावी व सक्षमपणे शेतकऱ्यांची बाजू मांडत त्याना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना  पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना माजी जि प सदस्य सुरेंद्रसिह चंदेल,  माजी नगराध्यक्ष तथा शेतकरी नेते डॉ महेन्द्रकूमार मोहबंसी,  आदिवासी नेते अविनाश गेडाम,  नरेंद्र तिरणकर , नगरसेवक पुंडलिक देशमुख,  सामाजिक कार्यकर्ता आशीश काळे , संतोष भट्टड,  जयराम नैताम,  पुरषोत्तम तिरगम,  दशरथ लाडे , फुलचंद उपराडे,  सूमेरी नैताम,  वासूदेव मांदाळे,  गजानन जांभुडकर,  धर्मेंद्र परीहार,  श्यामसुंदर जांभुडकर,  गुरूदेव सोनटक्के,  मेघशाम राऊत,  विवेक ठलाल , मगंलसिंग हलामी,  दयाराम,  उसेंडी संतोष , मांदाळे व बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते .     Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-25


Related Photos