महत्वाच्या बातम्या

 वारकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा


- वंचित आघाडी चे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करू असा इशारा चंद्रपुर वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्री फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राजुरा विधानसभेचे उमेदवार भूषण फुसे यांनी केली आहे.


प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे पहिल्यांदाच दिंडी सोहळ्याला गालबोट लागले. सरकारने स्वतःची चूक झाकण्यासाठी वारकऱ्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला करणे हे संतापजनक आहे. वारकरी संप्रदायामध्ये लहान-मोठा, श्रीमंत-गरीब हा भेद नाही. वारकर्‍यांच्या मुखात केवळ विठ्ठलनामाचा गजर असतो. अश्या वारकऱ्यांवर लाठीहल्ला करून शिंदे- फडणवीस सरकारने संपूर्ण महाराष्ट्राला कधीही न भरून निघणाऱ्या वेदना दिल्या आहे. 


शेकडो वर्षांची जुनी परंपरा असलेला वारकरी संप्रदाय या सरकारला कधीही माफ करणार नाही. असेही वंचितचे युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करू असा इशारा चंद्रपुर वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर, शहर महासचिव हर्षवर्धन कोठारकर, शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ गणवीर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धीरज तेलंग यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos