अवकाळी पावसाने आरमोरी तालुक्यात रब्बी पिकासह विटा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. यामुळे रब्बी पिकांना फटका बसला आहे. तसेच विटा व्यावसायिकांचे व मजुरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले   आहे.
 शुक्रवारी सायंकाळ पासून वादळी पावसाने सुरूवात केली. पावसा सोबत गारपीट सुद्धा झाली.  रब्बी पिके काढण्याच्या मार्गावर आहेत तसेच विटा व्यावसायिक व मजुर विटा बनवायला जोमाने सुरूवात केली होती . मात्र अवकाळी पाउस व वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे विटा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे २६ जानेवारीला आलेल्या पावसामुळे विटा व्यावसायिाकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक सुरक्षित बेरोजगार हा व्यवसाय करून आपला उदनिर्वाह करतात. मात्र अवकाळी पावसामुळे विटा व्यावसायीकांचे व शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-17


Related Photos