पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद


वृत्तसंस्था /  श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर काल १४ फेब्रुवारी रोजी  झालेल्या हल्लात ४४ जवान शहीद झाले आहेत. या शहिदांमध्ये संजय राजपूत आणि नितीन राठोड या महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे.
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील होते. तर शहीद नितीन राठोड हे बुलढाण्यातीलच लोणार तालुक्यातील होते. या जवानांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर त्यांच्या गावी मोठा आक्रोश करण्यात आला.  Print


News - Rajy | Posted : 2019-02-15


Related Photos