महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२४ मे महत्वाच्या घटना

१६२६ : पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.

१८४४ : तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.

१८८३ : न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.

१९४० : इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.

१९७६ : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सु

१९९१ : एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९९४ : २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

२००० : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

२००१ : १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.


२४ मे जन्म

१६८६ : फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक डॅनियल फॅरनहाइट यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १७३६)

१८१९ : इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९०१)

१९२४ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)

१९३३ : रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९९)

१९४२ : पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.

१९५५ : संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म.

१९७३ : भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक शिरीष कुंदर यांचा जन्म.


२४ मे मृत्यू

१५४३ : पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १४७३)

१९५० : भारताचे ४३वे गर्वनर जनरल आर्चिबाल्ड वावेल यांचे निधन. (जन्म: ५ मे १८८३)

१९८४ : डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक विन्स मॅकमोहन सीनिय यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९१४)

१९९३ : जुन्या पिढीतील संगीतकार व गायक बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी यांचे निधन. (जन्म: ६ मे १९२० – हैदराबाद)

१९९५ : इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१६)

१९९९ : पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९०१)

२००० : दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos