महत्वाच्या बातम्या

 एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचा डेटा हॅक : आयोगाकडून सायबर पोलिसांत तक्रार दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. मात्र या परीक्षेच्या फक्त एक आठवडा अगोदर लाखो विद्यार्थ्यांची माहिती हॅक करण्यात आली आहे.

एवढेच नाही तर या परीक्षेचे प्रवेशपत्र म्हजेच हॉल तिकीट सध्या सोशल मीडियावर लीक झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सोशल मीडिया प्लँटफॉर्म असणाऱ्या टेलिग्रामवर या परीक्षेचे हॉलतिकीट असणारी एक लिंक व्हायरल झाली असून यासोबतच हजारो विद्यार्थ्यांची माहिती हॅक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता आयोगाने सायबर पोलिसांत तक्रार केली आहेत.

माहितीनुसार ३० एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, क च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल ९० हजारांपेक्षा जास्त विध्यार्थ्यांचे हॉल तिकिट हॅक झाले आहे. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपलोड करण्यात आले आहेत. या परीक्षेचा पेपर देखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.

एका टेलिग्राम चॅनलवर ३० एप्रिलला होणार्‍या परीक्षेचा डाटा लीक झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याअनुषंगाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यातील वस्तुस्थिती पडताळणी केली जाणार आहे. त्यासोबतच पेपर लीक होत नसतात, ते खोटे आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांनी दिले आहे. ३० एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. तत्पूर्वी, पेपर व हॉल तिकीट लीक झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता सायबर पोलिस त्याचा तपास करतील. त्यानंतर सत्यता पडताळून पेपर कधी होणार की ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल हे निश्चित होईल. त्यासाठी ४-५ दिवस वाट पहावी लागेल.





  Print






News - Rajy




Related Photos