महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२० एप्रिल महत्वाच्या घटना

१७७० : प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

१९३९ : अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.

१९४५ : दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

१९४६ : राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.

२००८ : डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.

२० एप्रिल जन्म

७८८ : ७८८ई .पुर्व : आदि शंकराचार्य यांचा जन्म.

१७४९ : मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.

१८०८ : फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८७३)

१८८९ : नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)

१८९६ : सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९६८)

१९१४ : ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)

१९३९ : ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर यांचा जन्म.

१९५० : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.

१९६६ : याहू चे सहसंस्थापक डेव्हिड फिलो यांचा जन्म.

१९८० : भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.

२० एप्रिल मृत्यू

१९१८ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन. (जन्म: ६ जून १८५०)

१९३८ : न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)

१९६० : बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन. (जन्म: २४ जुलै १९११)

१९७० : गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)

१९९९ : रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)





  Print






News - todayspecialdays




Related Photos