महत्वाच्या बातम्या

 २७ एप्रिलला विशेष ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या मार्फत २७ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शिवाजी स्टेडीयम भंडारा या ठिकाणी कार्यालयीन वेळेत महीलांसाठी विशेष प्लेसमेंट ड्राईव्ह/ पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या अनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्त्यांनी त्यांचेकडील रिक्तपदांची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर विशेष प्लेसमेंट ड्राईव्ह / पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा- १ येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. तसेच जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी २७ एप्रिल रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे.

अधिक माहीतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रिडा संकुल, भंडारा येथे ०७१८४२५२२५० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.





  Print






News - Bhandara




Related Photos