महत्वाच्या बातम्या

  कोरची शहरात विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मौजा कोरची येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बाजार चौक कोरची येथील बौद्ध झेंडा येथे महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा अर्चना करण्यात आले. व नंतर पोलीस स्टेशन कोरची येथील पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व बौद्ध बांधव हे धम्मभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अर्पण करून तेथील ध्वजारोहण नगरपंचायत कोरची येथील नगराध्यक्ष हर्षलता भैसारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लुंबिनी बुद्ध विहार येथे सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. व तेथील ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष नसरुद्दीन भामानी, कोरची तालुका व्यसनमुक्ती संघटक निळा किन्नाके, रामदास साखरे, शिक्षक चंद्रशेखर अंबादे, शिक्षक किशोर साखरे, प्राचार्य देवराव गजभिये, नगरपंचायत उपाध्यक्ष हिरालाल राऊत, तुळशीराम अंबादे, राकेश मोहुर्ले, संतोष मोहुर्ले, अरुण गुरुनुले, चेतन कराडे, मनोज टेंभुर्णे, श्रीहरी मोहुर्ले, नाशिक नागमोती, सुधाकर हीडामी, चंद्रपाल भैसारे आधी सह बहुसंख्य संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता सर्व बौद्ध बांधवा तर्फे भीम रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली संपूर्ण गावात मोठ्या गाजावाजात काढण्यात आले. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून त्यांची सुद्धा आकर्षक झाकी काढण्यात आले. सदर रॅलीमध्ये ठिकठिकाणी विविध समाजातर्फे शरबत व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महात्मा फुले चौकात माळी समाजातर्फे सुद्धा या रॅलीत उपस्थित झालेल्या सर्व  बांधवांसाठी महाप्रसाद तसेच शरबतचे आयोजन करण्यात आले होते. तिथूनच संपूर्ण माळी समाज या रॅली मध्ये सहभागी झाले होते. कोरची शहरातील मुख्य चौकात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. सदर रॅलीमध्ये युवक व युवती हे डीजेच्या तालावर थिरकतानी दिसून आले. समस्त ग्रामवासी व बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. या रॅलीचे समापन लुंबिनी बौद्ध विहार येथे करण्यात आले तेथे सुद्धा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर संपूर्ण कार्यक्रमांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते. १५ एप्रिल ला सुद्धा बौद्ध समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जसे लहान मुलांचे मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. व महिलांसाठी सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जसे संगीत खुर्ची स्पर्धा, गीत गायन स्पर्धा व सदर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात सुद्धा आले. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील धम्मभूमी येथे बौद्ध समाज कोरचीच्या वतीने भव्य समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. देवराव गजभिये, उदघाटिका  हर्षलता भैसारे व कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक कविवर्य सामाजिक विचारवंत ज्ञानेश वाकुडकर नागपूर व प्रसिद्ध वक्ते तथा सामाजिक विचारवंत जिंदा भगत नागपूर यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला कोरची शहरातील प्रतिष्ठित नागरिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन सोनाली सोरदे यांनी केले प्रास्ताविक किशोर साखरे व आभार चंद्रशेखर अंबादे यांनी मानले. त्यानंतर गावकऱ्यांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. व रात्री ठीक नऊ वाजता लोकांच्या मनोरंजनाकरिता उगवली पहाट निळ्या पाखरांची या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा आस्वाद तालुक्यातील बहुतेक जनतेने घेतले. दोन दिवसाचे संपूर्ण कार्यक्रम हे शांततेत पार पडले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos