महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर : शॉर्ट सर्किटमुळे कोळसा ट्रकला लागली आग


- उन्हाळ्याची चाहूल लागताच बल्लारपूर शहरात आग लागण्याची घटना 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर वेकोलि उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयासमोर सोमवारी एकाच दिवसात दोन आग लागल्याची घटना घडल्या.  

१० एप्रिल ला दुपारी १ वाजताच्या सुमारास वेकोलि उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय समोर अचानक आग लागली होती. त्याची माहिती नगर परिषद अग्निशामक विभागाला ला दिली गेली. अग्निशमन दल न.प. बल्लारपूर चे कर्मचारी सुभान कुरेशी, सादिक बेग, हरिओम मडावी, प्रमोद पिसुद्दे यांनी आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.

तर दुसरी घटना वेकोली ओपन कास्ट माईन येथे असलेल्या सुरक्षा चौकी समोर रात्री ११ वाजताच्या सुमारास कोळसा ट्रक क्र. MH 34 BG 4314 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. याची माहिती वेकीली अधिकाऱ्यांनी पोलीस विभाग व नगर परिषद अग्निशामक विभाग ला दिली. लगेच अग्निशमन विभाग चे वाहन येऊन आग आटोक्यात आणले. अग्निशमन दलाचे कर्मचारी मधुकर श्रीपुरवार, विकास करमणकर, शुभम निखाडे, मुकेश मून आणि शाहरुख खान वेकोलि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणले.





  Print






News - Chandrapur




Related Photos