याचिका फेटाळल्याने चिडलेल्या सरकारी वकिलाने लगावली थेट न्यायाधीशांच्याच कानशिलात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
एका खटल्यासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळल्याने चिडलेल्या एका सरकारी वकिलाने थेट निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्याच जोरदार कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर येथील जिल्हा न्यायालयात आज २६ डिसेंबर रोजी घडला. या हल्ल्यामुळे  न्यायाधिशांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी हल्लेखोर वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 न्या. के. आर. देशपांडे असे मारहाण झालेल्या न्यायाधिशांचे नाव असून ते सिविल कोर्टात न्यायाधीश आहेत. तर अ‍ॅड.  समीर पराटे असे हल्लेखोर सरकारी वकिलाचे नाव आहे. अ‍ॅड.  पराटे यांच्या वडिलांवरील एका खटल्यासंदर्भातील याचिका न्या. देशपांडे यांनी बुधवारी फेटाळून लावली. त्यानंतर चिडलेल्या पराटे यांनी न्या. देशपांडे यांच्या जोरदार कानशिलात लगावली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे न्या. देशपांडे यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. अ‍ॅड.  समीर पराटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2018-12-26


Related Photos