चाकण येथे भर दिवसा सात वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य : तरुणाला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पिंपरी : चाकण एसटी स्टॅण्ड समोर मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एका तरुणाने सात वर्षीय चिमुकलीसोबत गैरकृत्य केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
लिकन लोकनाथ शिल (वय 27, रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 23 वर्षीय आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सात वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारी चाकण एसटी स्टॅन्डच्या आवारात खेळत होती. तिथे आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग केला. विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्या हाताला धरून जबरदस्तीने तिला एसटी स्टॅन्डच्या कोपऱ्यात नेले. तिथे तिच्यासोबत आरोपीने गैरकृत्य केले. या प्रकाराला पीडित मुलीने प्रतिकार केला असता आरोपीने तिला हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महा सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
News - Pune | Posted : 2022-03-02